المدة الزمنية 4500

भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स इथं इंग्लंडनं भारताचा एक डाव आणि ७६ धावांनी पराभव केला.

بواسطة DD Sahyadri News
329 مشاهدة
0
7
تم نشره في 2021/08/28

भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडनं भारताचा एक डाव आणि ७६ धावांनी पराभव केला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कालच्या तिसऱ्या दिवसाच्या २ बाद २१५ या धावसंख्येवरून भारतानं खेळाला सुरूवात केली. दिवसाच्या सुरुवातीलाच ९१ धावांवर खेळत असलेला चेतेश्वर पूजारा बाद झाला. भारताच्या २३७ धावा झाल्या असताना विराट कोहली ५५ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाला डाव सावरता आला नाही. विराटपाठोपाठ अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज बाद झाले. भारताचा डाव २७८ डावांत आटोपला. इंग्लंडतर्फे राबिन्सननं पाच तर ओव्हर्टननं तीन गडी बाद केले. 28/08/2021

الفئة

عرض المزيد

تعليقات - 0